RCB च्या विजयाला गालबोट,चिन्नास्वामीत चेंगराचेंगरी ! 10 जण दगावले

Photo of author

By Sandhya

आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे, या दुर्दैवी घटेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आरसीबीच्या संघानं तब्बल 18 वर्षांनी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे, मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा पराभव केला. दरम्यान त्यानंतर आज निघालेल्या आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.आरसीबीच्या विजयी रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली, या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून 30 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तब्बल 18 वर्षांनी आरसीबीनं आयपीएलचं विजेतेपद मिळवलं . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा लाडका खेळाडू विराट कोहोली यांचं स्वप्न 18 वर्षांनी साकार झालं. हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आरसीबीच्या फॅननं चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. याचवेळी ही दुर्घटना घडली.हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आरसीबीच्या फॅननं चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. तब्बल 5 लाखांपेक्षा अधिक लोकं हा सोहळा अनुभवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते अशी माहिती मिळत आहे. तर या स्टेडियमची आसन क्षमता अवघी 32 हजार इतकी आहे. स्टेडिअममध्ये जागा नव्हती, तरीही काहीजण आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते.गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, यावेळी चहा त्यांची पळापळ झाली. लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी आरसीबीची टीम स्टेडियममध्ये उपस्थित नव्हती. ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी आरसीबीच्या टीमचा विधानभवन परिसरात सत्कार सुरू होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page