बारामती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 संदर्भात निरीक्षकांची आढावा बैठक

Photo of author

By Sandhya

Review meeting of observers regarding Baramati Zilla Parishad and Panchayat Samiti Elections 2026


राज्य निवडणूक आयोगाकडून बारामती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर निरीक्षक नरवाडे यांनी बारामती प्रांताधिकारी कार्यालयात निवडणूक कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडावी, तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीनंतर निरीक्षक नरवाडे यांनी स्ट्रॉंग रूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्थापनाची पाहणी केली.
निवडणुकीसंदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी निरीक्षक विशाल नरवाडे यांच्याशी 7498668879 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती बारामती निवडणूक कार्यालया कडून देण्यात आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page