अजित पवार हे शरद पवार साहेबांना वडील मानत होते. वडिलांना सोडून स्वत:चे साम्राज्य निर्माण करण्यासाठी तसेच, कारवाईपासून लपून राहण्यासाठी ते भाजपासोबत गेले.
त्यांनी वडिलांचा विचार केला नाही. ज्या व्यक्तीने आपला मुलगा पार्थचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी अजितदादा आले होते.
दादांची आजची स्थिती काय आहे, हे त्यावरून समजते, अशी टीका करून पार्थच्या पराभवाचा बदला संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करून घेणार, असे विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी व्यक्त केला.
चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे व पदाधिकारी उपस्थित होते.