पुणे : प्रेम प्रकरणातून दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले.
तरुणीवर वार करत असताना तिथं उपस्थित असलेल्या दोन युवकांनी मध्यस्थी केल्याने तरुणीचा जीव वाचला आहे. त्यानंतर वार करणाऱ्या आरोपीला चोप देत पोलीस चौकीत नेण्यात आलं.
हा धक्कादायक प्रकार आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. मुळशी) असं आरोपी तरुणाचं नाव आहे.