समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; 25 लोक झोपेतच होरपळून…

Photo of author

By Sandhya


समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली.

यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नागपूरहून पुण्याला जात होती. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. आधी ही बस डिव्हाइडरला धडकली. नंतर लोखंडी पोलवर आदळून बस उलटली. त्यानंतर बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते.

अधिकतर प्रवासी यवतमा, वर्धा, नागपूर येथील होते. अपघातानंतर ८ प्रवासी खिडकीच्या काचा फोडून बाहेर आल्याने सुखरूप वाचले. घटनास्थळी पोलिस पथक तातडीने दाखल झाले आहेत. पोलिसांनी 25 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले असल्याची माहिती दिली आहे.

नागपूरहून निघालेली ही बस बुलढाण्यातील सिंदखेड राजा भागात पिंपळखुंटा येथे 1 वाजून 26 मिनिटांनी हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सुरुवातीला लोखंडी खांबावर आदळली. नंतर डिव्हायडरला धडकली त्यानंतर उलटली.

दरम्यान यामुळे बसचा डिझेल टँक फुटला आणि बसने पेट घेतला. आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले आणि भीषण अग्नितांडव सुरू झाले. यातील काही प्रवासी काच फोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने सुखरूप बचावले. 

घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.

Leave a Comment