हातात वाढायला शरद पवार यांनीच भांडे दिले म्हणून तुम्ही वाढपी आहात, नाहीतर तुम्हाला पत्रावळ्या उचलायची वेळ आली असती. तुम्हाला काम करण्याचे सामर्थ्य तुमच्या काकांनीच दिले अन्यथा तुम्हाला बारामतीत राजदूतवर दूधच विकावं लागलं असतं,
अशी जोरदार टीका शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करीत हल्लाबोल केला. ‘मी वाढपी आहे, मी ठरवेल कोणाला किती द्यायचं’, या अजित पवारांच्या वाक्यावर भाष्य करताना राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राऊत म्हणाले, बारामती, शिरूर मतदारसंघात अजित पवार जाहीरपणे धमक्या देत आहेत. व्यापारी, उद्योजक, काम करणार्या लोकांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. माझ्या पत्नीचे काम करायचे, नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल, अशा धमक्या दिल्या जात आहेत, ही भाषा त्यांना शोभत नाही.