वरळीमध्ये त्यांचा उमेदवार आलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. वंचित, सपा यासारखे पक्षही उमेदवार देतात. भाजपला मदत करण्यासाठी काही पक्ष उमेदवार उतरवतात.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी निवडणूक लढू नये असे आम्ही म्हणत नाही. दादर, माहिम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली, तिथे ते लढणार नाही, असे होऊच शकत नाही. दरम्यान, वरळीत अदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यांने निवडून येणार.
लोकांनी त्यांचे काम पाहिलेय. लोकांसाठी धावणारा नेता. वरळीत कोणालाही येऊ द्या.. आदित्य ठाकरे निवडून येणारच, असे संजय राऊत म्हणाले.
मोठा उभा करणार म्हणजे ट्रम्पला उभा करणार का का प्रिन्स चार्जला आणणार मोठा म्हणजे ट्रम्प याच्यापेक्षा मोठा उमेदवार किंवा नरेंद्र मोदी यांना दिले किंवा शहाला अंतिम याच्यापेक्षा मोठा अगोदर असेल तर मला सांगा मी अज्ञानी माणूस आहे, असे राऊत म्हणाले.