संजय राऊत – हे सरकार क्षणभर देखील राहणार नाही

Photo of author

By Sandhya

संजय राऊत - हे सरकार क्षणभर देखील राहणार नाही

सत्तासंघर्षाचे प्रकरण हे शेवटी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडेच येणार आहे. सत्ताधारी सरकारमधील १६ आमदार जर अपात्र ठरले, तर इतर २४ आमदार देखील अपात्र ठरतील. मुख्यमंत्री देखीलअपात्र ठरतील. त्यानंतर हे सरकार क्षणभर देखील राहणार नाही, असे स्पष्टपणे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, देशात लोकशाही आहे की नाही हे निकाल आल्यावरच कळेल. न्यायालय लोकशाहीची हत्या करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. संबंधित सत्तासंघर्षाचे प्रकरण हे शेवटी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडेच जाणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना आज ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. यावर बोलताना ते म्हणाले, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, मी त्याच्यावर बोलू शकत नाही. असे म्हणत संजय राऊत यांनी जयंत पाटील यांना आलेल्या ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार दिला. तसेच आम्ही ‘मविआ’ संदर्भात अतिशय आशावादी आहोत, असे देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Leave a Comment