संजय राऊत : ‘मोदींजींचा कृत्रिम जलवा संपला, खोटा मुखवटा उतरला…’

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पहिल्या कलामध्ये हरियाणामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाने आघाडीवर असून काँग्रेसला पिछेहाट होताना दिसत आहे.

दुसरीकडे काश्मीरमध्ये मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला धक्का दिला आहे. मात्र भाजप- काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु असून अंतिम निकाल कुणाच्या बाजूने लागेल, याबाबत सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. या निकालावरुन आता संजय राऊत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत? “कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. हरियाणात भाजप, मोदी- शहांविरोधात लाट आहे. हरियाणाची जनता भाजपला कौल देणार नाही. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या.

जम्मू काश्मीरमध्येही जनतेने मोदी- शहांना बाहेर काढले आहे. कुठेही निवडणूक घ्या, भाजपचा पराभव निश्चित आहे. मोदींजींचा कृत्रिम जलवा, खोटा मुखवटा उतरला आहे. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात राहुल गांधी किंवा प्रियांका गांधींना मुख्यमंत्री व्हायचं नाही. येथे स्थानिक नेतृत्व आहेत.

शरद पवार, उद्धव ठाकरे साहेब. आम्हाला माहित आहे जागावाटप कसे व्हायला पाहिजे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमच्या जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल. काँग्रेसकडे जर मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल तर त्यांनी जाहीर करावा. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं चेहरा असेल तर जाहीर करा आम्ही त्यांना पाठिंबा देतो लोकांमध्ये संभ्रम नको अशी शिवसेनेची भूमिका आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page