विधानसभा निवडणुकीसाठी मविआकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. या मागणीमुळे महाविकास आघाडीत वातावरण तापणार आहे.
या मागणीत राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचीच अप्रत्यक्ष मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील इतर घटक पक्षाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना महायुती सरकारवर टीका केली. ते म्हणाले,’नव्या संसदेची आज रीतसर सुरुवात होत आहे.
राष्ट्रपतींच भाषण आज होईल. अल्पमताचं सरकार भाषणातून किती पाठ थोपटून घेत आहे, किती थापा मारतंय ते पहावं लागेल. यावेळची लोकसभा ही पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्याचं प्रतिबिंब हे राज्यसभेत सुद्धा पहायला मिळेल. भाजपने बहुमत गमावलं आहे.
कुबड्यांवरचे पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट हे आपल्याला पहावं लागतंय असं राऊत म्हणाले. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. आम्ही अजूनही आहोत, हे दाखवण्याचा ( सरकारकडून) प्रयत्न नक्की होईल.
पण हा पीळ उतरवण्याचं काम आम्ही करू. हे काम विरोधी पक्षनेते, राहुल गांधी हे नक्की करतील याची आम्हाला खात्री आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत, राहुल गांधी यांच्याबद्दल विश्वास दर्शवला