संजय राऊत : “सचिन वाझे भाजपाचा प्रवक्ता, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन…”

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

मागील दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.

“अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे”, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. या प्रकरणावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन वाझे हा भाजपाचा प्रवक्ता आहे. लवकरच त्याला भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करतील आणि यामागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सचिन वाझे भाजपाचा प्रवक्ता-संजय राऊत- देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खून, दहशतवाद यात अडकलेला आरोपी भाजपाचा प्रवक्ता म्हणून काम करतो आहे. राजकारणासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी सरकारमधले लोक गुंड आणि टोळ्यांचा वापर करत आहेत, हे सिद्ध झालं. तुरुंगात यांचे फोन जात आहेत, प्रतिनिधी जात आहेत. कुणी काय बोलायचं ते सांगत आहेत.

मला माध्यमांचं आश्चर्य वाटतं खुनातल्या, दहशतवादातल्या आरोपीला तुम्ही इतकं महत्त्व देत आहात. सचिन वाझेला भाजपाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाते. तो काहीतरी सांगतो, देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिल्याचं सांगतो याला काय म्हणायचं? सचिन वाझेची नार्को सोडा भाजपाच्या लोकांची नार्को करा म्हणजे समजेल त्यांनी काय काय करुन ठेवलं आहे.

अनिल देशमुख, संजय राऊत , नवाब मलिक, संजय सिंग, अरविंद केजरीवाल या सगळ्यांना ईडी, पोलिसांचा गैरवापर करुन अडकवण्यात आलं. मुंबईचे त्यावेळेचे पोलीस आयुक्त आणि या खटल्यातले मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं. कारण त्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केले.

तुरुंगातले दहा लोक आम्ही उभे करु शकतो जे देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, अमित शाह यांचं नाव घेतील. भाजपाने असे संत महात्मे गोळा केले आहेत. सचिन वाझेलाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून काही दिवसांनी स्वच्छ करतील. असंही संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचं गटार केलं आहे- देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाचं गटार केलं. देवेंद्र फडणवीसांनी समोर येऊन सांगायला पाहिजे की गुंड आणि दहशतवाद्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवू नका. हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे, हे गृहमंत्री काय करत आहेत? तर टाळ्या वाजवत आहेत, सचिन वाझेच्या वक्तव्यावर.

देवेंद्र फडणवीस वकील आहेत. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो. देवेंद्र फडणवीस याचे सूत्रधार होते. कधीकाळी सचिन वाझे आमच्या जवळचे होते हे सोडून द्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी हे सगळे जवळचे होतेच.

आज ते कुठे आहेत? वर्तमानात बोला असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सचिन वाझेने असं बोलण्याची तिसरी वेळ आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपा आणखी रसातळाला जाणार यात शंका नाही. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Comment