
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर सहाव्या जागेसाठी पाठवण्याचा आमच्याकडे प्रस्ताव आहे. आमच्याकडे ३२ मत आहेत आणि आम्ही सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती पाठवणार आहोत, अशी माहिती आज (दि.८) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
देशातील राज्यसभेच्या रिक्त जागांवर निवडणूक घोषित झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज माध्यमांशी बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी सहाव्या जागेसाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठवण्याचा प्रस्ताव असल्याते म्हटले आहे.
पुढे बोलत असताना ते म्हणाले की, “आता पंतप्रधान मोदी रामाला विसरले आणि कॉंग्रेसचे भजन करु लागले आहेत. ४०० जागा जिंकू म्हणतात आणि कॉंग्रेसची भिती वाटते त्यांना.
ते मणिपूर प्रश्न, काश्मीर पंडितांवर का बोलत नाहीत. त्यांनी ज्यांच्याकडे मत मागितल आहे तिकडे आता ते दुर्लक्ष करत आहेत. पण २०२४ नंतर कोणालाही मोदींचं स्मरण राहणार नाही.”
दरम्यान संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्या चांदीच्या दुकानांवर दरोडे.
अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत! पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी! गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य!”