जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त जास्त आहे, त्या ठिकाणी तो पक्ष जास्त जागा लढवेल. विदर्भात काँग्रेसला वेगळ स्थान आहे त्यामुळे तेथे त्यांच्या जास्त जागा दिसत आहेत. ९० ठिकाणी नाराजांची समजूत काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. त्यामुळे आम्ही बंडखोरांची समजूत काढू असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले.
सांगली पॅटर्नवर बोलताना राऊत म्हणाले, सांगली पॅटर्न हा महाराष्ट्राचा पॅटर्न नाही. हा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा म्हणत आम्हाला राज्यात बदल घडवायचा आहे आणि तो बदल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल असे ते म्हणाले. शेकापच्या जागांसाठी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.
शेकापसाठी आम्ही निवडून आलेल्या जागाही सोडायला तयार आहोत. विद्यमान आमदार असलेली जागाही आम्ही सोडली आहे. मविआतील सहकारी पक्षांसाठी आम्ही तडजोडी केल्याचे त्यांनी सांगितले.
रश्मी शुक्लांबद्दल बोलताना त्यांनी शुक्ला यांनी आमचे फोन टॅप केले होते. त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा अशी मागणी राऊत यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर.आर. पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचाही आपल्या खास शैलीत समाचार घेत त्यांनी अजित पवार यांच्यावर मिष्किल टिपण्णी केली. आता अजित दादांचे हेड कॉर्टर गुजरातेत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी विरोधकांवर त्यांनी टीकास्त्र सोडले.