
शालेय जीवनातच वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी पाहत, वडिलांच्या सुंदर कलात्मक वस्तूंमधून प्रेरणा घेऊन उत्तम मूर्तिकार बनलेल्या विनोद श्रीराम येलारपूरकर यांनी पालख्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची 5 फुटांची फायबरची मूर्ती साकारून पालख्यांचे स्वागत केले आहे.
शाळेत असतानाच वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी पाहणे, तयार करणे, गणेशमूर्ती तयार करणे, घरच्या घरी कलात्मक पद्धतीने डेकोरेशन करणे, अशा अनेक सृजनात्मकतेला खतपाणी घालणार्या गोष्टींकडे त्यांचा कल असायचा.