सासवड मध्ये गुणवंतांचा गौरव कलाशिक्षक पुरस्कार व विद्यार्थी मार्गदर्शन सासवड मधल्या गुरुकुल करियर अकॅडेमी मध्ये पार

Photo of author

By Sandhya



कलाशिक्षक पुरस्कार व विद्यार्थी मार्गदर्शन सासवड मधील गुरुकुल करिअर अकॅडमीमध्ये पार पडले. दि. २३.०२.२०२४ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. संदीप टिळेकर (संस्थापक अध्यक्ष, गुरुकुल करिअर अकॅडमी, सासवड) होते, तर उद्घाटन मा. श्री. हुसेन खान (चाचा) (संस्थापक अध्यक्ष, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ) यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. नंदकुमार सागर (सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ), मा. श्री. सुधाकर जगदाळे (सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई), मा. श्री. कुंडलिक मेमाणे (मुख्याध्यापक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त), मा. श्री. वसंतराव ताकवले (राज्य प्रवक्ते, माध्यमिक शिक्षक संघ), मा. श्री. तानाजी झेंडे (सचिव, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी), रामप्रभू पेठकर (उपाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ, पुणे), दिलीप नेवसे (अध्यक्ष, पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ), किरण सरोदे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कला-क्रीडा शिक्षक महासंघ) आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यात सर्वात महत्त्वाचा पुरस्कार “पुरंदर कलाभूषण” हा श्री. महेंद्र थोपटे (शिल्पकार) यांना प्रदान करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनही कलेच्या जोरावर यशप्राप्ती कशी करता येते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून व भाषणातून सर्वांना सांगितले. त्यांच्यासोबत पुरंदरमधील शाळांमधील उत्कृष्ट व गुणवंत प्राचार्य म्हणून श्रीमती रेणुका सिंग मर्चंट (प्राचार्य, श्री शिवाजी स्कूल, सासवड) आणि श्री. दत्ताराम रामदासी (वाघिरे हायस्कूल, सासवड) यांना सन्मानित करण्यात आले.

गुणवंत कलाशिक्षक म्हणून सुहास वाघमारे, विद्या जगताप, मनीषा कुदळे, हेमलता येळे, पांडुरंग दुर्गाडे आणि प्रगती कापरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतात, या पुरस्काराला आपल्या कार्याची पावती असल्याचे गौरवोद्गार काढले.

Leave a Comment

You cannot copy content of this page