सासवड | बुलेटचे सायलेन्सर काढून रोड रोलर खाली चिरडले सासवड पोलिसांची कारवाई

Photo of author

By Sandhya


सासवड : पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे शहर असलेल्या सासवड शहरामध्ये बुलेटचा सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात बुलेट चालवणाऱ्या आणि त्याचबरोबर फटाक्यांचे आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर सासवड पोलिसांनी कारवाई केलीय ….या बुलेटचे सायलेन्सर काढून ते नष्ट करण्यात आले आहेत.. या सायलेन्सरवरून पोलिसांनी बुलडोझर फिरायलाय….तर मोठा आवाज काढून ध्वनीप्रदूषण केल्याबद्दल, त्याचबरोबर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून दंड वसूल करण्यात आलाय.. तर बुलेट चा लावणारे चालक हे अल्पवयीन असल्यास त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिलीय

तर आजची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, पोलीस उपनिरीक्षक चोरगे, पी.एस, पोलीस निरीक्षक पाटील, वाहतूक अंमलदार योगेश गरुड, संतोष शिंदे, आबासो बनकर, अभिजीत कांबळे, वॉर्डन राऊत, वचकल पोलीस मित्र लोंढे यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page