पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार मध्ये एक जण गंभीर रित्या जखमी झालाय. तर या संदर्भात स्थानिक व प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील बस स्थानका समोर हा प्रकार घडला असून.
तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय. यावेळी एकावर गोळी झाडण्यात आलीय. गोळीबार यामध्ये ४१ वर्षीय राहुल नामदेव टिळेकर हे गंभीर रित्या जखमी झालेत. जखमीला पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलय.
सासवड एसटी बस स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतात अशी प्राथमिक माहिती मिळतेय. दुपारी चार वाजलेच्या दरम्यान ही घटना घडलीय. घटना घडल्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भातील अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत.