सतेज पाटील : ”कोल्हापूरच्या मातीतून निवडून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवा”…

Photo of author

By Sandhya

सतेज पाटील

 कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती.

आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचार सभेत बोलतांना  कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी गद्दारांना धडा शिकवा म्हणत टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले सतेज पाटील ‘ज्या खासदाराला जीवाचं रान करून निवडून आणलं. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. शरद पवार यांचा पक्ष फोडला, अशा गद्दारांना त्यांची जागा दाखविण्याची ही वेळ असून, मतदानातून त्यांना धडा शिकवा’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page