ठाणे | लेक बुडत असल्याचं पाहून आईनं नदीत उडी घेतली; वाचवताना भाचीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Photo of author

By Sandhya


ठाणे : ठाण्यातील शहापूर तालुक्यातील भातसा नदीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेक आणि भाची यांचा बुडून मृत्यू झाला.. यामध्ये एक लहान १५ वर्षीय मुलाचा समावेश असून जीवरक्षक पथकाच्या सदस्यांनी तीनही मृतदेह बाहेर काढले आहेत. यासंबंधीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली . ही घटना शहापूर तालुक्यातील गोठेघर वाफे येथील भातसा नदीत घडली आहे. वनिता सुदर्शन शेळके (वय ३३ रा. वाफे) लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय ५० रा. चेरपोली) धीरज दत्तात्रय पाटील (वय १५ वर्ष रा . चेरपोली ) ही मृत व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मृत लक्ष्मी आणि वनिता या दोन महिला कपडे धुण्यासाठी दुपारच्या सुमारास वाफे येथील भातसा नदीवर गेल्या होत्या. वनिता या लक्ष्मी यांच्या भाची होत्या. त्या दोघांसोबत लक्ष्मी यांचा मुलगा धीरज देखील गेला होता. उन्हाचा तडाखा असल्याने धीरज अंघोळ करण्यासाठी नदी पात्रात उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो बुडत असल्याचे लक्षात येताच. त्याची आई लक्ष्मी यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्याही बुडू लागल्या. हे पाहताच वनिता यांनी नदी पात्रात उतरत दोन्ही माय लेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवाने तिघांचा ही नदीत बुडून दुदैवी मृत्यू झाला .

वाफे येथील भातसा नदीत तीन जण बुडाल्याची माहिती पोलिस व जीवरक्षक टिमच्या सदस्यांना मिळताच तत्काल घटनास्थळी पोहोचून शोध घेत तीनही जणांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत या माय लेक व भाची यांची प्राण ज्योत मावळली होती. या घटनेने सर्वांचे मन हेलावून गेले आहे. या तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उप जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना समजात पाटील आणि शेळके परिवारावर शोककळा पसरली आहेच आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment