ज्येष्ठ पत्रकार विक्रांत आढाव यांचे निधन

Photo of author

By Sandhya

Senior journalist Vikrant Adhav passes away

क्रीडा पत्रकारितेत आपली ठळक ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विक्रांत आढाव (वय ५२) यांचे शनिवारी (ता. २१) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्यातील पत्रकारिता क्षेत्रासह क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

विक्रांत आढाव यांनी दीर्घकाळ क्रीडा पत्रकार म्हणून काम करताना विविध राष्ट्रीय-राज्यस्तरीय स्पर्धांचे सखोल वार्तांकन केले. क्रिकेट, कुस्ती, ॲथलेटिक्ससह विविध क्रीडा प्रकारांवरील त्यांचे अभ्यासपूर्ण लिखाण आणि स्पष्ट मांडणीमुळे ते वाचकांमध्ये लोकप्रिय होते. क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर त्यांचा अचूक दृष्टिकोन आणि तरुण पत्रकारांना दिलेले मार्गदर्शन यामुळे त्यांनी पत्रकारितेत वेगळी छाप सोडली.

त्यांच्या अकाली निधनाने सहकारी पत्रकार, क्रीडापटू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आढाव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि बहिण असा परिवार आहे.

त्यांच्यावर रविवारी (ता. २२) दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची कायम आठवण राहील, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page