साक्री शहरासह परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात यश

Photo of author

By Sandhya

साक्री शहरासह परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात यश

साक्री शहरासह परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला येथील पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विजय रमेश दाभाडे (२९, रा.इंदिरानगर, भाडणे ता. साक्री) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे.

साक्री पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी, चोरीसह विविध कलमान्वये दाखल गुन्हयाचा तपास करतांना पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत त्याने साक्री शहरासह दहिवेल, दिघावे, कासारे येथील घरफोडीच्या गुन्हयाची कबुली दिली. त्याच्याकडून विविध गुन्ह्यात चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण २ लाख ४० हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी पीआय रवींद्र देशमुख, पीएसआय रोशन निकम, एएसआय कैलास पाटील, रामदास पाटील, अशोक पाटील, संजय शिरसाठ, अनिल शिंदे, शांतीलाल पाटील, जगदीश अहिरे, रोहन वाघ यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page