शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र सातारा दौऱ्यावर

Photo of author

By Sandhya

शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र सातारा दौऱ्यावर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सोमवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर समर्थकांनी पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केले. पक्षाच्या आमदारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात पवार यांचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच नव्हे तर विविध पक्षीयांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राज्यभरातून दबाव वाढला होता. अखेर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.

शरद पवार सोमवारी आणि मंगळवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने त्यांच्या जल्लोषी स्वागताची तयारी करण्यात आली होती. सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर आज सायंकाळी शरद पवार यांचे आगमन होताच आ. दिलीप वळसे- पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, बाळासाहेब सोळसकर, दीपक पवार यांच्यासह पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांवर समर्थकांनी जोरदार पुष्पवृष्टी केली. “देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो,’ देश की जनता करे पुकार शरद पवार, शरद पवार,’ “शेतकऱ्यांचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार’ आदी घोषणांनी कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाचा परिसर दणाणून सोडला.

राजकुमार पाटील, राजेंद्र लावंघरे, अमित कदम, समिंद्रा जाधव, तेजस शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या लाडक्‍या नेत्याचे स्वागत केले. दरम्यान, शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची उपस्थिती होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते स्वागतासाठी आल्याने शासकीय विश्रामगृह व परिसरात मोठी गर्दी झाली होती. सातारा पोलिसांच्यावतीने याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page