भाजप त्यांच्याकडे सत्ता गेली तर लोकशाही व संविधान शिल्लक राहणार नाही. जगामध्ये अनेक ठिकाणी हुकुमशाही नांदताना अनेक हुकुमशा होवून गेले मात्र, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत हुकुमशाही नव्हती. सत्ताधार्यांचा सामन्य मानसांपेक्षा सत्तेवरच विश्वास आहे.
त्यामुळे त्यांच्यातील मानवता नष्ट झाली आहे, त्यामुळे शहरातील गांधी मैदान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी खासदार शरद पवार बोलत होते.
यावेळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. अदित्य ठाकरे, आ. रोहीत पवार, आ.राहुल जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, योगीता राजळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. प्रतापराव ढाकणे, आमदार सुनिल शिंदे,नगरसेवक योगीराज गाडे, संभाजी कदम, भुषण होळकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, रोहिदास कर्डिले, विक्रम राठोड, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार रोहीत पवार यांनी भाषणाच्या प्रारंभीच इंग्रजीत बोलू का मराठीत बोलू असा प्रश्न करून भाजपचे उमेदवार खा. डाॅ. सुजय विखे यांची खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्न उपस्थित केला.
यावेळी माजी आमदार निलेश लंके म्हणाले, जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने बहुतांश तालुक्यात नागरिकांशी संवाद साधतांना तेथील प्रश्नांचे गांभिर्य लक्षात आले. गेल्या पाच वर्षात येथील प्र्श्न सुटले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
हे प्र्श्न सोडविण्यासाठी आणि नगर दक्षिणेचे वैभव पुन्हा परत मिळविण्यासाठी मला एकवार मतदार मायबापांनी एक संधी द्या असे भावनीक आवाहन लंके यांनी केले. दरञान आज पवार यांच्या उपस्थितीत नगर नंदनवन लॉन येथे महाविकास आघाडीच्या वतीने बैठका झाल्या.
टीडीएफ (शिक्षक संघटना), चार्टर्ड अकाउंटंट संघटना, मुस्लिम समाज संघटना, मातंग समाज संघटना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी, उद्योजकांची संघटना, बहुजन क्रांती पक्ष, तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), कॉंग्रेस तसेच विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत कैफियत मांडली. गेल्या पाच वर्षांत कोणतेही मोठे कामे झाले नाही. संबंधित खासदारांनी कोणतीही ठोस कामे केली नाहीत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांच्यासारख्याच उमेदवाराची गरज होती. ती आज पवार साहेबांमुळे पूर्ण झाली.
आता आम्ही सर्व संघटनांनी पवार साहेबांचे हात बळकट करण्याचे ठरविले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून येईल, अशी ग्वाही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणतेही भाषण न करता त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे समजावून घेतले. उमेदवार लंके यांनी आभार मानले. फाळके यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्रातील अनेक रोजगार देणारे मोठे उद्द्योग गुजरातच्या घषात अबकीबार ४०० सो पार नसून अपकीबार भाजपा व मित्र पक्ष हद्दपार होणार असल्याची टिका करताना त्यांनी केंद्रसरकारच्या धोरणांचा भांडाफोड केला. भारताच्या दक्षिण भागत भाजपाची एकही जागा येत नाही. भाजपाने पक्ष आणि चिन्ह चोरून घरे फोडली आहेत.
भाजपा सत्तेच्या काळात पेट्रोल, डीझेल गॅस वाढीची महागाई भडकाल्याने सामान्य मानसाला जीने नकोसे झाले आहे. महाविकास आघाडीच्या काळात शेतकर्यांना कर्ज माफी दिली. आत्ताच्या सरकारने शेतकरर्यांना काय दिले असा सवाल ही त्यांनी केला. राज्यातील सत्ताधार्यांच्या काळात महाराष्ट्रात एकही नविन उद्योग उभा राहिलेला नाही.
या उलट महाराष्ट्रातील अनेक रोजगार देणारे मोठे उद्द्योग गुजरातच्या घषात नेऊन राज्यातील बेरोजगार तरुणांवर अन्याय केला आहे, असे माजी मंत्री आमदार अदित्य ठाकरे म्हणाले.