मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे. पण या निर्णयाचा आणि महाविकास आघाडीचा काही संबध नाही. तसेच या आधीही काही संबध नव्हता.
त्यांनी घेतलेला निर्णय हा पुर्णत: त्यांचा आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद आहे. अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली. मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीचा निर्णय योग्य : पवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे.
आयोगाने राज्य सरकारला हा इशारा दिला आहे. त्याच बरोबर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. असेही ते म्हणाले.