
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे. शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवारांनी त्यांचा निर्णय बोलून दाखविला.
त्याला उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधही केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य नेते यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पण शरद पवारांच्या निर्णयाचे अजित पवार यांनी समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे.
शरद पवारांच्या या निर्णयामागची ५ कारणे पुढील प्रमाणे
१. अजित पवार यांच्या फुटीची शक्यता गृहीत धरून पक्षनेतृत्वात बदल केला जातोय.
२. राष्ट्रवादीला अजित पवार यांच्या ताब्यात जाण्यापासून रोखणे.
३. सुप्रिया सुळे यांच्या ताब्यात पक्ष देणे.
४. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी ज्येष्ठ नेत्यांची गळती रोखणे.
५. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष अद्यापही आपलेच नेतृत्व मानत असल्याचे दाखवून देणे.
६. वाढते वय.