शरद पवार : “महाराष्ट्रातही निर्माण झाली असती मणिपूरसारखी परिस्थिती पण…”

Photo of author

By Sandhya

शरद पवार

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी एक मोठी भीती व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित सामाजिक एकता परिषदेच्या निमित्ताने शरद पवार यांनी मणिपूरमधील घटनांप्रमाणे महाराष्ट्रात अशांततेची भीती व्यक्त केली आहे. पण त्यांनी पुढे असेही सांगितले की, राज्याच्या समृद्ध परंपरेमुळे अशा घटनांना महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही.

यावेळी त्यांनी मणिपूरमधील घटनांवर भर दिला, सध्या तिथे एकेकाळी एकत्र राहणारा कुकी-मेतेई समुदाय आता एकमेकांविरोधात हिंसाचार करत आहे.

अनेक महिन्यांपासून दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरू असलेल्या मणिपूरमधील परिस्थितीचे गांभीर्य सांगून शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “मणिपूरमधील हिंसाचारामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली,

महिलांना त्रासाला सामोरे जावे लागले तर शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.” त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “एकेकाळी मणिपूरमध्ये जिथे दोन समुदाय एकत्र राहत होते, आता ते एकमेकांशी बोलायलाही तयार नाहीत.”

महाराष्ट्राबद्दल भीती राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणाले, आज जे काही घडलं त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना तिथे जाऊन जनतेला दिलासा द्यावा, असं कधीच वाटलं नाही. हा प्रकार मणिपूरमध्ये घडला. शेजारील राज्यांमध्येही असेच घडले.

कर्नाटकातही तेच दिसून आले आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही असेच घडण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, महाराष्ट्राला समरसतेची आणि समतेची दिशा देणाऱ्या अनेक दिग्गजांचा वारसा आहे. त्यामुळे अशा घटनांना राज्यात स्थान मिळणार नाही.

दरम्यान महाराष्ट्रातही गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहे. मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी आहे.

अशात मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश झाल्यास ओबीसींवर अन्याय होईल असा दावा करत ओबीसी नेते या मागणीला विरोध करत आहे. त्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये कटूता निर्माण झाल्यासरखी परिस्थिती होत आहे.

Leave a Comment