श्री मलंगगडावर समाधी मंदिराच्या बाहेर आक्षेपार्ह घोषणा देण एका गटाला महागात पडणार आहे. याबाबत हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून पोलिसांवर देखील हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची दखल खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी घेतली असून पोलीस उपायुक्त सुधारकर पाठारे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या शनिवारी 24 फेब्रुवारीला हिंदू बांधव आणि शिवसैनिक श्री मलंग गडावर जाऊन पूजा करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मंगळवारी श्री मलंगगड येथे पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी काही वादाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. याविषयी
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, त्याठिकाणी जो प्रकार घडला त्याची नोंद पोलिसांनी घेतलेली आहे. असे जर प्रकार घडत असतील तर त्यावर कारवाई होईल.