
दौंड : तेर पोलिसी सेंटर आयोजित राष्ट्रीय स्तरावरील तेर ग्रीन ऑलिम्पियाड या पर्यावरणावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रशालेने घेतलेला सर्वाधिक सहभागाबाबत व गेली अनेक वर्ष प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेनेने राबवलेल्या विविध पर्यावरण पूरक उपक्रम साठी तेर पॉलिस सेंटर ने राष्ट्रीय स्तरावरील ग्रीन स्कूल अवॉर्ड देऊन शेठ जोतिप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दौंड या प्रशालेस गौरविले अशी माहिती प्राचार्य तथा हरित सेना पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली
गेल्या दहा वर्षापासून प्रशालेतील मुलांमध्ये या स्पर्धेविषयी आवड निर्माण झाली आहे ही स्पर्धा गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाबाबत जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने तेर पॉलिसी सेंटर ने सुरू केली या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पत्रकार भवन पुणे येथे संपन्न झाला हा पुरस्कार टाटा मोटर्स च्या हेड एच.आर. आदिती गुप्ता,उपव्यस्थापक रोहित सरोज, तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्षा डॉ विनिता आपटे यांच्या शुभहस्ते प्रशालेतील पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी तसेच प्राचार्य प्रमोद काकडे उपशिक्षक श्रेणिक उपाध्ये ,रामदास मखरे, नेहा गोसावी,नूरजहा मनियार ,उदय गोलांडे आदींनी स्वीकारला सदर प्रसंगी विविध राज्यातून विजेत्या ठरलेल्या शाळा तसेच विद्यार्थी यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूरदर्शनचे सुहास धारणे यांनी केले, प्रशालेत यापूर्वी सहा वेळा उत्कृष्ट सहभागाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे प्रशालेच्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया,चेअरमन विक्रम कटारिया,प्राचार्य प्रमोद काकडे,उप प्राचार्य श्रीकृष्ण देवकर, उपमुख्याध्यापक नवनाथ कदम,पर्यवेक्षक रामदास होले,पर्यवेक्षिका कुंतीका चवदार व सर्व शिक्षक सेवक वृंदानी केले.