जे शिवसेनेतून निवडून आले होते ते शिंदे गटातील १३ खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत. त्या सर्व जागांवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार निवडून येतील. ठाकरे गटाचे १९ खासदार विजयी होतील असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आज माध्यमांशी ते बोलत होते.
नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार मोदी सरकारकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. नव्या संसद भवनाची देशाला गरज होती का? जुनी इमारत अजून १०० वर्ष चालली असती.
नावाच्या पाट्या लावण्यासाठी नव्या संसद भवनाची निर्मिती करण्यात आली आहे, असा टीका खासदार राऊत यांनी पंदप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. देशाच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटनासाठी का डावलण्यात आलं?
पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघेही एकत्र कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात. पण राष्ट्रपती महिलेची आठवण का झाली नाही. राष्ट्रपतींना डावलल्याने या सोहळ्यावरती काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष बहिष्कार टाकणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.