शिरुर तालुक्यात आंबळे येथे सावत्र भावानेच केला वहिनीचा खुन; भाऊ गंभीर जखमी

Photo of author

By Sandhya

शिरुर तालुक्यात आंबळे येथे सावत्र भावानेच केला वहिनीचा खुन; भाऊ गंभीर जखमी

शिरुर तालुक्यात आंबळे येथे सावत्र भावानेच केला वाहिनीचा खुन; भाऊ गंभीर जखमी तर खुन करुन पळून जाताना आरोपीची दुचाकी चारचाकी गाडीला धडकल्याने आरोपी ठार

रांजणगाव गणपती:- शिरुर तालुक्यातील आंबळे येथे घरगुती वादातून एका सावत्र भावाने बंगल्याच्या टेरेसवर झोपलेल्या भावाला आणि वहिनीला व्यायाम करण्याच्या लोंखडी डंबेल, चाकु आणि विटाने मारुन गंभीर जखमी केले असुन त्यात त्याची वहिनी प्रियंका सुनिल बेंद्रे (वय 28) मृत्यूमुखी पडली असुन भाऊ सुनिल बाळासो बेंद्रे हा गंभीर जखमी झाला आहे.

तसेच गुन्हा करुन दुचाकीवर पळून जात असताना आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे हा चारचाकी गाडीला धडकल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी पुणे येथे नेले असताना आरोपी अनिल बेंद्रे मयत झाला आहे.

याबाबत मुलांचे वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे (वय ५९ ) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय २५ ) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब बेंद्रे यांचा थोरला मुलगा सुनिल आणि सुन प्रियांका पुण्यामध्ये आयटी कंपनीत कामाला आहेत. १ में रोजी ते लंडन येथे जॉबसाठी जाणार होते. तसेच दुसरा मुलगा अनिल हा पुणे येथे कंपनीत काम करत होता. मात्र अनिल याच्या विक्षिप्त वागण्यामुळे तीन कंपण्या त्याला बदलाव्या लागल्या होत्या.

काही महिन्यापूर्वी त्याचे कंपनीतील काम गेल्यामुळे, तो वैफल्यग्रस्त तसेच व्यसनाधीन झाला होता. त्यामुळे तो (दि 15) एप्रिल रोजी पुण्यातुन आंबळे येथे आपल्या गावी आला होता. या कंपनीचे त्याचे काम त्याचा भाऊ सुनील याच्यामुळे गेले असा त्याचा गैरसमज झाल्याने गावाला येऊन तो सतत आई-वडील यांच्याशी भांडणे करीत असल्यामुळे ते मिटवण्यासाठी वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी मुलगा सुनील व सून प्रियांका यांना आंबळे येथे बोलविले होते.

सोमवारी रात्री याबाबत दोन्ही भावांमध्ये सविस्तर चर्चा झाली नंतर घरातल्या सर्वांनी याबाबत त्याला समजुनही सांगितले. रात्री जेवण केल्यानंतर प्रियांका व सुनील हे घराच्या टेरेस वरती असणाऱ्या खोलीत झोपले होते. वडील पोर्च मधे तरअनिल घरात झोपला होता.

पहाटे 4:30 च्या सुमारास अचानक आरडा ओरडा ऐकू आल्याने वडील बाळासाहेब हे वर पाहण्यासाठी गेले असता. त्यावेळेस अनिल हा प्रियांका व सुनिल यांना चाकू, व्यायाम करण्याचे डंबेल्स आणि विटाने मारत असल्याचे पाहिले . अनिलने प्रियंका हिच्यावर मोठ्या प्रमाणात वार केल्यामुळे प्रियांका हिचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील याला पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आणि आरोपी अनिल हा मोटार सायकलवर (MH 12 MU 4286) आंबळे वरुन न्हावरेच्या दिशेने पळुन जात असताना न्हावरे- चौफुला रस्त्यावर समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला (MH 12 EX 6695) समोरासमोर धडक बसल्याने त्यात तोही ही गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला असल्यांचे पोलिसांनी सांगितले.

सुनिल यांचीही तब्बेत गंभीर असुन त्यांच्या छातीवर चाकुचे वार तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. प्रियांका यांच्या छातीवर चाकुचे वार तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे.

प्रियांका यांच्या छातीवर खोलवर चाकुने पाच वार केले असुन स्वतःचा बचाव करत असताना त्यांच्या उजव्या हातालाही चाकुच्या जखमा झालेल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.

यावेळी घटनास्थळी शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, सुजाता पाटील, एकनाथ पाटील, पोलिस हवालदार नितीन सुद्रिक, सहायक फौजदार चव्हाण, पोलिस शिपाई भोते, पोलिस नाईक वाघमोडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

त्यांचे स्वप्न अधुरेच राहीले..
सुनिल व प्रियांका हे दोघेही आय टी इंजिनिअर होते, त्यांचे लग्न दोन वर्षापुर्वी झाले होते. त्यांना लंडन येथे जॉब करण्याची संधी मिळाली होती त्यामुळे ते खुप आनंदात होते . १ में रोजी ते जाणार होते मात्र काळाने दुर्देवी घाला घातला अन् सुखी संसाराचे स्वप्न अपूर्ण राहीले अशी प्रतिक्रिया प्रिंयाकाचे भाऊ स्वप्निल सयाजी भोसलकर ( वाघोली) यांनी भावना व्यक्त केली.

Leave a Comment