धक्कादायक ! लग्नासाठी निघालेल्या बसचा अपघात; ५ जण जागीच ठार तर ३५ जण जखमी झाले आहेत.
हा अपघात ताम्हणी घाटात झाला आहे. तसेच ताम्हाणी घाटातील धोकादायक वळणावरील वॉटर फॉल पॉईंट येथील दरीत बस कोसळली असुन अपघात कशामुळे झाला याची माहीती मिळु शकली नाही. शुक्रवार २० डिसेंबर रोजी सकाळी एम एच १४ जी यू ३४०५ ही बस चाकण वरुन महाडला लग्नासाठी जात असताना हा सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. बसमध्ये ४० प्रवासी होते. यात ५ प्रवासी जागीच ठार झाले असून त्याची नावे अशी आहेत.
01) संगीता धनंजय जाधव वय – 35 रा. पुणे,
02) शिल्पा प्रदीप पवार 45 वर्ष
03) वंदना जाधव उर्फ सपकाळ वय 35 वर्ष
04) गौरव धनावडे वय 45 वर्ष
05) गणेश इंगळे वय 36 वर्ष राहणार अकोला (बसचा क्लीनर) असे पाच जण जागीच ठार झाले आहे.
तर यात गंभीर दुखापती पुढील आहेत
01) सुप्रिया अरुण मांढरे वय 50 वर्ष रा. पुणे
02) सुधा अशोक माने वय 60 वर्ष रा. पुणे
03) सुनिता अशोक धनवडे वय 50 वर्ष रा. पुणे
04) संगीता नामदेव जाधव वय वर्ष 62 रा. पुणे यांना गंभीर दुखापत झालेली असून बसमधील इतर 30 प्रवासी यांना किरकोळ स्वरूपात दुखापत झालेली आहे
अपघाता ठिकाणी माणगाव पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या टिमने घटनास्थळी जाऊन मयतास , व बाकी प्रवासीयांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहे. तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.