झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ हा लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो आपल्या गुणी स्पर्धकांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यांना प्रेरणाही देत आहे. हा प्रतिष्ठित मंच प्रगल्भ होऊन भावी गायकांच्या कारकिर्दीला आकार देणारा एक प्रतिष्ठित ‘लाँचपॅड’ बनला आहे, त्यांना मेंटॉरशिप प्रदान केली जात आहे आणि त्यांना अगदी असमांतर प्रसिद्धीही प्राप्त होत आहे. ह्या शोमधील स्पर्धा शिगेला पोहोचली असून अख्खा देश थक्क होऊन आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी चीअर करत आहे आणि त्यांना केवळ गायकापासून कसलेल्या कलाकारांमध्ये परावर्तित होताना पाहत आहे. ह्या शोमधील सन्माननीय मेंटॉर्स सचिन-जिगर, सचेत परंपरा आणि गुरू रंधावा हे त्यांचे कौशल्याने संवर्धन करत आहेत.
‘सा रे ग म प’ चा आगामी भाग हा प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे कारण नवीन आगामी चित्रपट ‘वनवास’मधील गुणी कलाकार – नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर हे ह्या शो च्या मंचावर उपस्थित असणार आहेत. एकमेकांसोबत चित्रीकरण करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल सांगताना सिमरत कौरने सांगितले की तिला कायमच वाटायचे की नाना पाटेकर हे अतिशय गंभीर व्यक्ती आहेत पण प्रत्यक्षात मात्र ते खोड्या काढण्यात पटाईत आहेत.
सिमरत कौर म्हणाली, “मी नाना सरांचा अतिशय आदर करते. त्यांच्या उपस्थितीमुळे बहुतेक लोक भांबावून जातात, पण मला त्यांची भीती वाटत नाही कारण मला माहिती आहे की नाना सर हे अतिशय विनोदी आणि खोडकर आहेत. एकदा आमच्या सेटवर एक आश्चर्यचकित करणारी आणि अनपेक्षित अशी घटना घडली आणि अगदी अचानक ते सर्वांना ओरडायला लागले आणि म्हणायला लागले की मी चाललो, मला उशीर होतोय आणि ते ऐकताच अख्खा क्रू अगदी गंभीर झाला, खास साहाय्यक दिग्दर्शक. आणि तेवढ्यात नाना सर हसायला लागले आणि म्हणाले, “ठीक आहे, चला परत कामाला लागूया.”
ह्या सगळ्या गप्पागोष्टींसह ह्या भागातील संगीताचा संस्मरणीय सोहळा पाहायला चुकवू नका. आगामी भागांमधील अविस्मरणीय परफॉर्मन्सेस तुम्हांला नक्कीच आवडतील.