पुणे-सातारा महामार्गावर एसटी कंटेनरचा भीषण अपघात ; दोन प्रवाशांचा मृत्यू , पाच जण गंभीर जखमी

Photo of author

By Sandhya

सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ एसटी कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटीतील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला एका एसटी बसने मागून जोराची धडक दिली. या धडकेत एसटी बस उलटली.

बस उलटल्यामुळे बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. तसेच यावेळी एक कार देखील कंटेनरला मागून धडकली.

मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत. दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page