State Ghadashi Samaj Art Festival concludes in Jejuri





“भारतीय संगीत हृदयाशी संवाद करते, सनईचे सूर मांगल्य निर्माण करतात”
– प्रा डॉ. नारायण टाक.
भारतीय संगीताची परंपरा ही केवळ श्रवणानुभव न राहता थेट माणसाच्या हृदयाशी संवाद साधणारी आहे. सनईचे सूर मांगल्य, शुभत्व आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत,सनई व चौघाडा वाजवण्याची परंपरा घडशी समाजाने पिढ्यान्पिढ्या जपली असून शेकडो वर्षांपासून ही कला त्यांनी जतन केली आहे. देशात पाश्चात्त्य संगीताचे प्रभाव वाढत असताना देखील घडशी समाजाने भारताच्या प्राचीन संगीत संस्कृतीचे जतन करून ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली आहे.असे विचार लेखक,व माजी प्राचार्य डॉ नारायण टाक यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्यअखिल घडशी समाजाच्या वतीने तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत संगीतकार कै विश्वनाथ मोरे यांच्या स्मृतीपित्यर्थ युवाकला महोत्सव व कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रम प्रसंगी डॉ नारायण टाक बोलत होते.
या युवा कला महोत्सवाचे उदघाटन जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई उपाध्यक्ष गणेश निकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेजुरी देवसंस्थान चे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे , माजी विश्वस्त डॉ प्रसाद खंडागळे महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे अध्यक्ष अनिल पवार उपस्थित होते .
मंदिर संस्कृतीचे उपासक म्हणून कला संस्कृती आणि धार्मिक मांगल्याचे सनई वादक म्हणून घडशी समाज ओळखला जातो.तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत कुलदैवत खंडोबा देवाची सेवा करणारा हा समाज माझ्या हृदयात आहे भाव उदगार नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
समाजाने आयोजित केलेल्या समाज युवा कला महोत्सवात मुंबई, सातारा, सांगली,कोल्हापूर सह राज्यातील विविध जिल्ह्यातून कलाकारांनी हजेरी लावली. चौघडा या लोकपारंपरिक वादयावर आणि सेक्सोफोन या वेस्टर्न वाद्यवर वदंना साळुंखे या महिला कलाकारने आपली कला सादर करीत रसिकांना मंत्रमुगध केले .
या वेळीं माजी विश्वस्त संदीप जगताप , नगरसेवक, अस्लम पानसरे, रोहित खोमणे,शिवाजी जगताप, प्रशांत लाखे,दादा उबाळे, सुनील असवलिकर सचिन खोमणे, माऊली खोमणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनश्याम मोरे, तर निवेदन नगरसेवक समीर मोरे यांनी केले.