Sub-divisional officers appeal to maintain cleanliness in the office premises after a cleanliness drive at the administrative building


उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यालय प्रमुखाने कार्यालयासोबत परिसर स्वच्छ राहील याबाबत दक्षता घ्यावी, प्रशासकीय भवन परिसरात पाण्याच्या बाटल्या, चहाचे कागदी कप आदी वस्तू टाकू नये, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले.
यावेळी उप विभागीय व तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.