सुनिल कांबळे यांना पाठिंबा; डॉ. प्रमोद सावंत यांचा डॉक्टरांसोबत संवादाने प्रचाराला नवी दिशा

Photo of author

By Sandhya

सुनिल कांबळे

भाजप महायुतीचे उमेदवार सुनिल कांबळे यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुण्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. या विशेष संवाद मेळाव्याने निवडणूक प्रचाराला वेग मिळवून दिला आहे.

डॉ. सावंत यांनी महायुती सरकारच्या आरोग्य क्षेत्रातील यशस्वी योजनांची माहिती दिली. त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) आणि महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे सर्वसामान्य कुटुंबांना मिळालेल्या लाभांवर भर दिला. ते म्हणाले, “डबल इंजिन सरकारमुळे सामान्य माणसाला वैद्यकीय सुरक्षेचा मोठा आधार मिळाला आहे. हीच प्रगती महायुतीच्या विजयानंतर अधिक गतिमान होईल.”

संवादादरम्यान पुण्यातील मेट्रो प्रकल्पांच्या प्रगतीवरही चर्चा झाली. डॉ. सावंत यांनी सांगितले की, वनाझ ते रामवाडी आणि चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, भूमिगत मेट्रोमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल.

डॉक्टरांनीही या संवादाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सुनिल कांबळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्त्वात आरोग्य आणि इतर मूलभूत सेवांमध्ये सकारात्मक बदल होईल, असा विश्वास व्यक्त केला.

महायुतीच्या प्रचाराच्या या उपक्रमामुळे निवडणुकीत एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. “महायुतीने केलेय काम भारी, आता पुढची तयारी!” या घोषणेने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.

सुनिल कांबळे यांचा प्रचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा संवादांमुळे महायुतीला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page