बारामतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अगदी सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. दरम्यान बारामतीतील अजित पवार यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेला विजयाचे बॅनर कढण्यात येत आहेत.
अजित पवार यांच्या कार्यालयाबाहेर निकाल येण्यापुर्वी विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. पण आता ते काढण्यात आले आहेत. कारण, सुप्रिया सुळे यांनी ५० हजारांनी लीड घेतलं आहे. त्यामुळे बॅनर काढण्यात आले आहेत. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढण्यात आले आहेत. कारण बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढले आहेत. बारामतीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
भाजपच्या मदतीने अजित पवार यांनी बारामतीमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. सुनेत्रा पवारच रिंगणात असल्याने अजित पवारांनी अगदी बारामतीच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला होता. मात्र, बारामतीकरांनी अजितदादांना साथ न देता शरद पवारांना साथ दिल्याचे चित्र पहिल्या फेरीत दिसून येते आहे.
यावर्षीची लोकसभा निवडणूक ही अनेक गोष्टींनी महत्त्वाची ठरवणारी, अशी ऐतिहासिक असणार आहे. बारामती, जी फक्त पवारांच्या नावानं ओळखली जाते, तिथे पवारांच्याच घरातले या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले आहेत. या निवडणुकीवेळी वाढत्या उन्हामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.
बारामती लोकसभेसाठी एकूण 59. 67 टक्के इतके मतदान झाले आहे. सुप्रिया सुळे यंदा ‘चौकार’ ठोकणार, की भाजपचे ‘मिशन बारामती’ यंदा यशस्वी होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.