सुप्रिया सुळे : आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता…

Photo of author

By Sandhya

सुप्रिया सुळे

बदलापुर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता. कारण हा देश संविधानाने चालतो. कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. हे खूप चिंताजनक आहे, ज्याचा चेहरा पूर्ण काळा कापडाने झाकला होता.

त्याच्या हातात बेड्या होत्या. मग तो बंदुकीपर्यंत पोहोचलाच कसा, त्याने पोलिसांवर अटॅक केला कसा, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या ‘एन्काउंटर’प्रकरणाचे ‘इन्क्वायरी’ करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

बारामती येथे आयोजित पत्रकार परीषदेत सुळे यांनी अक्षय च्या एन्काउंटर प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. सुळे म्हणाल्या, आपला देश कोणाच्या मर्जीने चालत नाही, संविधानाने चालतो.

संविधानामध्ये हि कृती बसत नाही. महाराष्ट्रात ‘एन्काऊंटर’ शब्द ऐकलेला नाही. हा एन्काऊंटर आहे का, याबाबत स्पष्टता करावी. त्याचा चेहरा काळा कपड्याने झाकलं होत, त्याचे हात बांधले होते, मग तो बंदुकी पर्यंत पोहोचला कसा,पोलीसांना गोळी लागली कशी, एन्काऊंटर झाला कसा हाच मोठा प्रश्न मला पडला आहे.

सरकारने हा खटला फास्टट्रॅकद्वारे चालवून जाहिररीत्या आरोपीला फाशी देण्याची ‘कमिटमेंट’ सरकारने केली होती. या प्रकरणी ‘एफ आय आर’ ला किती आणि का वेळ लागला,याची सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील,यापासून सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला आहे.

या सरकारने पक्ष फोडले , घर फोडल, इन्कम टॅक्स सीबीआय इडीच्या नोटीसा पाठविल्या एवढंच केले. कोणतेही ठोस कामे केली नाहीत. सरकारकडे सांगण्यासारखं काही नाही.त्यामुळे प्रत्येक ‘कॅबिनेट‘ला पंधरा दिवसाला नविन निर्णय घेण्यासारखा ‘गतिमान‘ सरकारला उत्साह कसा आला, असा टोला यावेळी सुळे यांनी लगावला.

बदलापुर अत्याचार प्रकणातील अक्षय शिंदेची काळजी नाही. उलट सरकारला माझी विनंती होती, त्याच्या नराधमांना फास्टट्रॅक द्वारे खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे. त्यामुळे अशा नराधमांवर वचक बसला पाहिजे, अशी माझी भुमिका होती.

मात्र, पोलीस कस्टडीत असलेला माणूस बंदुकी पर्यंत पोहोचलाच कसा पोलीसांना गोळी लागलीच कशी, ही चिंताजनक परिस्थिती आहे. या राज्यात पोलीस देखील सुरक्षित नाहीत. हा हल्ला झालाच कसा, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Leave a Comment