शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खसादार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल रविवारी हॅक झाला होता. यामुळे मला फोन किंवा व्हॉट्सअप करू नका असे, सुळे यांनी ट्विट करून कळविले होते. फोन हॅक झाल्याचे कसे समजले याची माहिती सुळे यांनी दिली आहे.
माझा फोन हॅक झाला आणि त्या फोनवरून जयंत पाटलांशी वेगळेच कोणीतरी बोलत होते. पक्ष नेला, चिन्ह गेले आणि आता फोन सुद्धा जायला लागला, अवघड आहे सगळे, असे सुळे म्हणाल्या. यावेळी सुळे यांनी अजित पवारांवरही निशाना साधला.
यांच्या मदतीने आम्ही निवडणून येतो असा आमचा गैरसमज होता. मात्र अमोल कोल्हे आणि आम्ही दोघे समदुःखी आहोत. त्यांची नाही तर दोघांची ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या बाजूने उभी होती.
बारामती आमची आण बाण शान अशी ओळख आहे. बारामतीत गुन्हेगारी वाढत आहे, यात आपण लक्ष घालू, असे सुळे म्हणाल्या. बारामती आणि शिरूर मतदारसंघ हे फक्त एकाच माणसाला कळतात, ते म्हणजे शरद पवार.
नाती 1500 रुपयांनी जोडली जात नाहीत. ज्यांना नातीच कळली नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा टोलाही सुळे यांनी अजित पवारांना लगावला.
बीडला आतापर्यंत कोणी एअरपोर्ट मागितला नव्हता, तो मागणारे एकमेव खासदार बजरंग सोनवणे आहेत. कोणीतरी काल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागितली. पण आता माफी मागून काय होणार? सरकार तुमचे आहे, त्यामुळे योग्य तो निर्णय लगेच घाययला हवा होता, असेही सुळे म्हणाल्या.
तसेच येत्या काही दिवसांत राज्यात आपले सरकार येणार आहे. महाराष्ट्राचा अर्थमंत्री केंद्रातील बैठकीला गैरहजर राहतो, यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होते. यामुळे निर्मला सीताराम आम्हाला म्हणतात, तुमच्या मंत्र्यांना बोलायला सांगा, आमचा मंत्रीच बैठकीला येत नाही तर बोलणार कोण, असे मी त्यांना म्हटल्याचे सुळे म्हणाल्या.