सुप्रिया सुळे : “दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार”

Photo of author

By Sandhya

सुप्रिया सुळे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजय अशी निवडणूक पार पडली.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना यश मिळाले तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे सर्व नेते मंडळी आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, अश्यातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे’, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पुणे जिल्ह्याने आतापर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले पण असं सुडाचं राजकारण कधी पाहिलं नाही.

दीड दोन महिन्याचा विषय आहे आपलंच सरकार येणार आहे. जो कोणी पालकमंत्री होईल तो विरोधी पक्षाचा पण मान सन्मान ठेवेल. लोकशाही पद्धतीने आपलं सरकार चालवू’, असं वक्तव्य करत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

तसेच, दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला तर आपला, जो कोणी पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मानच होईल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. पुणे येथील भुकूम येथील दौऱ्या दरम्यान ते बोलत होते.

Leave a Comment