बँक कर्मचाऱ्यांना धमकीप्रकरणी मनसैनिकांवर कारवाई करा – बँक ऑफ महाराष्ट्र असोसिएशन

Photo of author

By Sandhya


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना बँकांचा कारभार मराठीत होतोय की नाही ते पाहा, असा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला. त्यानंतर सोमवारपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये धडक द्यायला सुरुवात केली. बँकांमध्ये जाऊन थेट व्यवस्थापक मॅनेजेरच्या केबिनमध्ये मनसे कार्यकर्ते दिसत आहेत. मुंबईच नाही, राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते बँकांमध्ये जाऊन तिथे सर्व व्यवहार मराठीत होतोय की, नाही? याची खातरजमा करत आहेत.

काही व्हिडिओंमध्ये बँक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी वादावादी झाल्याचं दिसलं आहे. मनसेने काही ठिकाणी खळळ खट्याक केल्याच दिसलं. त्यानंतर आता बँका धस्तावल्या आहेत. त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. मराठी भाषेवरून मनसे आक्रमक असताना, बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे कार्यकर्ते ठाणे आणि पुणे येथील राष्ट्रीयीकृत बँक शाखांच्या व्यवस्थापकांशी संवाद साधत आहेत. मराठीचा वापर व्हावा यासाठी मनसेचे पदाधिकारी बँकेत जाऊन जाब विचारत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव ताम्हाणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलेलं आहे

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनची मागणी

१. बँक कर्मचाऱ्यांना धमकावणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा.

२. स्थानिक पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना बँक कर्मचारी आणि सरकारी मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश द्या.

३. बँक कर्मचाऱ्यांना अशा धमक्यांपासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश एमडी, सीईओ, ईडी आणि झोनल मॅनेजरसह बँक व्यवस्थापनाला द्या.

जर त्वरित कारवाई केली गेली नाही, तर संप आणि इतर कायदेशीर उपाययोजनांसह आमचा निषेध वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही – महाराष्ट्र बँक ऑफिसर्स असोसिएशन

Leave a Comment