तरुणीवर कोयत्याने हल्ला प्रकरणी तीन पोलीस निलंबित

Photo of author

By Sandhya

प्रेमसंबंध तोडल्याचा कारणातून तरुणीवर कोयत्याने हल्ला प्रकरणी पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी तिघा पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे़.

पोलीस हवालदार सुनिल शांताराम साठे, पोलीस शिपाई प्रशांत प्रकाश जगदाळे आणि पोलीस शिपाई सागर नामदेव राणे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. सदाशिव पेठतील स्वाद रेस्टॉरंट समोर मंगळवारी सकाळी १० वाजता हा प्रकार घडला होता़.

त्यात शंतनू जाधव याने या तरुणीवर कोयत्याने हल्ला करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला़. त्याला तीन धाडसी तरुणांनी वेळीच धाव घेत या तरुणीला वाचविले. त्यानंतर तिला घेऊन नागरिक पेरुगेट पोलीस चौकीत गेले.

त्यावेळी पोलीस चौकीत नेमणूकीला असलेले पोलीस कर्मचारी चौकीत नव्हते. त्यामुळे वेळेवर मदत मिळू शकली नाही. कामात हलगर्जी केल्यामुळे पोलिसांची प्रतिमा समाजात मलिन झाल्याचा ठपका ठेवून पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी तिघा पोलीस कर्मचा-यांना निलंबित केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page