पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, अपघातात दोन जण जागीच ठार

Photo of author

By Sandhya


पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील प्रयागधाम फाटा येथे बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला असुन दोन्ही ट्रक चक्काचुर झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहाय्यक पो निरिक्षक कांबळे, सहा पो उपनिरीक्षक उमेश जगताप, पो हवा सासकर, पो कॉ रत्नपारखे, माने, भिसे आदीनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील ट्रक क्रेनच्या साह्याने बाजुला काढून वाहतूक सुरुळीत केली. अपघात ऐवढा भीषण होता की चालकांना काढण्यासाठी खुप वेळ गेला. यावेळी मदतीला कस्तुरी प्रतिष्ठान, ॲम्बुलन्स चालक, क्रेन चालक, तसेच स्थानिक नागरिकांनी मोठे सहकार्य करुन दोन्ही ट्रक चालकांना अपघातातील ट्रक मधुन बाहेर काढले .

मिळालेल्या माहितीनुसार,(ता. ११ डिसेंबर) बुधवार रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एम एच ०१ डी आर ६८५१, ट्रक (सीमेंट बलकर) चालक महताब नियामत हुसैन, (वय २८ वर्ष) रा. सराबसती जिल्हा, युपी हा ट्रक (बलकर) सोलापूरच्या दिशेने निघाला होता. तर एम एच १२ क्यू -जी ७२२२ ट्रक (१४ टायर) चालक पार्थ रतनसिंह शितोळे (वय २० वर्ष) रा. पडवी ता.दौंड हा ट्रक मुबंईच्या दिशेने निघाला होता. तर प्रयागधाम फाटा येथे ७२२२ हा ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन समोरासमोर येणाऱ्या ट्रक (बलकर) वर जाऊन आदळला हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रक चालक पार्थ रतनसिंह शितोळे, महताब हुसेन हे जगीच ठार झाले असून दोन्ही ट्रकचा चक्काचुर झाला.

Leave a Comment