समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: क्रूझर पलटी होऊन 2 ठार, 13 जखमी

Photo of author

By Sandhya


समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्हा हदितील माळ सावरगाव ता. सिंदखेड राजा येथे सकाळी आठ वाजता दरम्यान मुंबई कॅरिडोर वर भीषण अपघात झाला. सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी आसेगाव तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ येथून भाविक क्रूजर गाडीमध्ये शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी जात असताना सिंदखेडराजा जवळील माळसावरगाव येथे समृद्धी महामार्गावर मुंबई कॅरिडोर चायनैज क्रमांक 344.7 जवळ क्रुझर क्रमांक MH-25-R-3579 चे डाव्या साईडचे पाठीमागील टायर फुटल्याने सदर क्रुझर अनियंत्रित होऊन समृद्धी महामार्गावर पलटी झाली त्याच वेळी पाठीमागून येत असलेली क्रेटा कार क्रमांकMH-29-CB-9630 ते चालक हर्षल देवानंद भाग्यवंत वय 28 वर्ष रा यवतमाळ यांना समोरील महामार्गावर पलटी झालेल्या क्रुझर चा अंदाज न आल्याने क्रुझरला पाठीमागून धडक दिली .यामध्ये 1)विद्याबाई साबळे वय 55 वर्ष व 2) मोतीराम बोरकर वय साठ वर्ष दोन्ही आसेगाव देवी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ असे जागेवरच मरण पावले. तसेच 1) भावना रमेश राऊत वय 30 वर्ष 2) प्रतिभा अरुण वाघोडे वय 45 वर्ष 3)मीराबाई गोटफोडे वय 65 वर्ष ह्या तिघीजणी गंभीर जखमी झाल्या.

त्यांना तात्काळ महामार्ग 108ॲम्बुलन्स चे डॉक्टर यासीन शहा वैभव बोराडे चालक दिगंबर शिंदे दळवी यांनी तात्काळ जालना येथे औषध उपचार कमी घेऊन गेले. व 4) संतोष साखरकर वय 28 वर्ष क्रुझर चालक,5) कमलाबाई जाधव वय 55 वर्ष 3) सुशीला जाणार वय 52 वर्ष 4) मिराबाई राऊत वय साठ वर्ष 5) छायाबाई चव्हाण वय 65 वर्ष 6) प्रमिला घाटोळ वय 60 वर्ष7) भक्ती राऊत वय 5 वर्ष8) रमेश राऊत वय 40 वर्ष 9) बेबीबाई येलोत वय 60 वर्ष10) मोतीराम बोरकर वय 65 वर्ष सर्व रा आसेगाव देवी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ. असे किरकोळ जखमी झाले व क्रेटा कार मधील कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही. सदर माहिती प्राप्त होताच महामार्ग पोलीस चे पीएसआय गजानन उज्जैनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश जाधव व स्थानिक पोलीस स्टेशन सिंदखेड राजाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप डोंगरे ,विष्णू नागरे तात्काळ धाव घेऊन किरकोळ जखमी यांना औषध उपचार कामी रावांना केले व QRV टीम सिंदखेड राजा चे पवन काळे ,खंडू चव्हाण ,अभिषेक कांडेकर व महाराष्ट्र सुरक्षा बल चे मच्छिंद्र राठोड ,अविनाश राठोड ,व अजय पाटील यांनी सर्व मृतक व जखमी यांना क्रुझर मधून बाहेर काढून अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या बाजूला करून व वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave a Comment