ठाण्यातील काठ अन घाट या हॉटेलला आग

Photo of author

By Sandhya

काठ अन घाट या हॉटेलला आग

ठाण्यातील पाचपाखाडी येथील सर्व्हिस रोडवर असलेल्या काठ अन घाट या हॉटेलला आग लागल्याची घटना पहाटे समोर आली.

सुमारे २५० स्क्वेअर फुट क्षेत्रफळाच्या या हॉटेलच्या मागील बाजूस भीषण आग लागल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सांगितले.

काठ अन घाट या हॉटेलला आग

तीन फायर वाहन व दोन वॉटर टँकर वाहनासह ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाचे जवान, नौपाडा पोलीस कर्मचारी, महावितरण विद्युत कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

काठ अन घाट या हॉटेलला आग

सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Leave a Comment