सासवड : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देश कसा चालवावा, कसा असावा कोणत्या सिद्धांतावर चालवायचा याचे भान राहिले नसुन संविधान पायदळी तुडवले जातेय, सरकार याची जबाबदारी घेत नाही अशा परिस्थितीत संविधानातील अधिकारांसाठी रस्त्यांवर उतरावे लागेल, जनआंदोलन करावे लागेल असे प्रतिपादन जन आंदोलनच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर यांनी केले आहे. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतीक भवनात भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित संविधान परिषदेत मुख्य अतिथी म्हणून पाटकर बोलत होत्या. विवेकी युवा मंच, संविधान परीवार, मासूम व अन्य सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित या परिषदेला ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा सुभाध वारे अध्यक्ष म्हणुन हजर होते. याच कार्यक्रमात प्रख्यात अभिनेता ओंकार गोवर्धन व लेखिका राही श्रुती गणेश विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते
आपल्या भाषणात मेधा पाटकर यांनी संविधानाची सध्या सुरू असलेली चिरफाड यावर जळजळीत भाष्य केले. विकासाच्या नावावर हजारोंचे विस्थापण होत असुन
विस्थापित विरूद्ध प्रस्थापित असा लढा सुरू आहे. संविधानावर हात ठेवून शपथ घेणारे राज्यकर्ते संविधान जगवण्याची संवेदना दाखवत नाहीत त्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना विशेषतः युवकांना जन आंदोलन, संघर्ष करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. धारावीचा भूखंड, मणिपूर, लडाख मधील आंदोलनं अशी अनेक उदाहरणे देत त्यांनी राज्यकर्त्यांचे नाकर्तेपणा स्पष्ट केला. संविधानाच्या अनेक अनुच्छेद विषयी त्यांनी भाष्य केले
“संविधानकी हत्या करनेवालो ए तुम जान लो.. आत्महत्या के जिम्मेदार तुम्हीं हो मानवो” या गीताने पाटकर यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
ओंकार गोवर्धन, राही श्रुती गणेश व सुभाष वारे यांनीही या प्रसंगी आपली मनोगते व्यक्त करत संविधान विषयी जागृती केली. विवेकी युवा मंच यांनी या प्रसंगी गीतातून व पथनाट्याद्वारे उपस्थितांचे संविधान विषयी प्रबोधन केले. लक्ष्मी श्रीकांत यांनी प्रास्ताविक केले तर मीना शेंडकर यांनी आभार मानले.
जेष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार, सुदामराव इंगळे ,माणिक झेंडे, प्रदिपअण्णा पोमण, पुष्कर जाधव, बबुसाहेब माहूरकर, बंडूकाका जगताप, कुमुदिनी पांढरे ,सुनील धिवार, परवीन पानसरे, मंजुश्री निरगुडे, पंकज धिवार, रमेश कानडे, अंकुश परखंडे, माऊली बाठे, किशोर बोत्रे, जगदीश पांढरे यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध गावच्या महिला, शेतकरी, मासून व विवेकी युवा मंचचे युवा कार्यकर्ते व सासवडकर नागरिक मोठया संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.