सोमवती अमावस्यानिमित्त हजारो भाविकांची गर्दी भंडारा खोबर्‍याची उधळण धामणीत सदानंदाचा येळकोट

Photo of author

By Sandhya

मंचर :

पुणे.नगर.नाशिक मुंबई जिल्ह्यातील हजारो भाविकांचे कुलदैवत असणार्‍या धामणी ( तालुका आंबेगांव) येथे आज सोमवारी (३० डिसेंबर) सोमवतीच्या निमित्ताने हजारो भाविकांनी गर्दी केलेली होती सकाळी ७ वाजता खंडोबा देवाच्या उत्सवमूर्तीच्या पालखी सोहळ्याने उगवत्या सूर्याच्या साक्षीने मंदिरातून देवमळ्यातील विहीरीवर शाहीस्नानासाठी प्रस्थान ठेवले यावेळी भंडार खोबर्‍याच्या व फुलांच्या उधळणीत सदानंदाचा येळकोटचा जयघोष करण्यात आला पारंपारिक वाद्याच्या व फटाक्याच्या आतषबाजीत सोमवती सोहळ्याला सलामी देण्यात आली हिंदू धर्माच्या पंचागानुसार मराठी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या सोमवारी (३० डिंसेबर) पहाटे ४वाजून १मिनिटाने सोमवती अमावस्येचा प्रारंभ झाला मंगळवारी सकाळी ३ वाजून ५६ मिनिटापर्यत सोमवतीचा पर्वकाळ असल्याने याच पर्वकाळात देवाच्या उत्सवमूर्तीच्या शाहीस्नानासाठी व पालखी सोहळ्यासाठी धामणी येथे पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केलेली होती सोमवारी पहाटे मंदिरातील सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाल्यानंतर सकाळी वाघे व वीर मंडळीनी गावातून पालखी खंडोबा मंदिरात नेऊन मंदिरातील पंचधातूचा खंडोबा.म्हाळसाई व बाणाईचे सर्वांगसुंदर मुखवटे परंपरागत सेवेकरी भगत मंडळीकडून घेऊन ते वाजतगाजत देवमळ्यातील विहीरीवर आणले. सोमवतीच्या व देवाच्या मानाच्या काठीच्या मानकरी मंडळीच्या व भाविकांच्या हस्ते खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्याला सुवासिक चंदन पावडर गुलाबपाणी व पुदीन्याचे अत्तराचा लेप देऊन शाहीस्नान घालण्यात आले पांडुरंग भगत.राहूल भगत.खंडू भगत.नामदेव भगत. या पंरपरागत सेवेकरी मंडळीनी खंडोबाची पूर्वकालीन सुरु असलेली पारंपारिक पूजा केली फुलांनी सजवलेल्या पालखीची गावातील पेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी सदानंदाचा येळकोट चा जयघोष करुन व फटाक्याची आतषबाजी करुन फुलांची व भंडार्‍याची उधळण करण्यात आली यामुळे धामणीतील सोमवतीचा सोहळा चांगलाच रंगला असल्याचे भक्तांना पाहावयास मिळाले देवमळ्यातील विहीरीवर सोमवती स्नानाची पर्वणी साधण्यासाठी गावडेवाडी.महाळूंगे पडवळ.गुंजाळवाडी.लांडेवाडी.तळेगांव ढमढेरे.मरकळ.बेल्हे.नांदूर.कुरकूटवाडी.पाडळी पारनेर.भराडी.फाकटे.कवठे. संविदणे.लोणी.खडकवाडी.पाबळ येथील हजारो भाविक जमलेले होते देवाच्या मुखवट्याला स्नान घालण्यासाठी महिला भाविकांची गर्दी लक्षणीय होती उपस्थित सर्व भाविकांनी सोमवतीच्या शाहीस्नानाचा आनंद घेतला सकाळी नऊ वाजता खंडोबाचे शाहीस्नान झाले त्यानंतर पूजा व महाआरती होऊन देवाच्या मुखवट्यावर फुले व भंडारा उधळण्यात आला त्यानंतर ग्रामस्थांच्या व देवस्थानाच्या वतीने सोमवतीचे मानकरी.देवाच्या काठीचे मानकरी.सेवेकरी व खांदेकरी आणि उपस्थित पंचक्रोशीतील भाविकांचा तसेच खेड.आंबेगांव,जुन्नर.शिरुर व पारनेर तालुक्यातील विविध आडनावाच्या कुळांचा सोमवतीचे मानपान देऊन तर महिला भाविकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव.सरपंच रेश्मा बोर्‍हाडे.सागर जाधव.अक्षय विधाटे.मनोज तांबे.कांताराम तांबे .भगवान वाघ.मच्छिद्र वाघ.गणेश तांबे.डाँ पाटीलबुवा जाधव.बाळासाहेब लालजी बढेकर विठ्ठल बढेकर.बाळासाहेब महादू बढेकर.मिलींद शेळके.निलेश करंजखेले.उत्तम जाधव.कैलास वाघ.भगवान बढेकर.चंद्रकात जाधव. संतोष बढेकर.अंकुश भुमकर .सुरेश बढेकर अजित बोर्‍हाडे.बबन भुमकर.सुभाष सोनवणे उपस्थित होते त्यानंतर सकाळी दहा वाजता उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात येऊन पालखीचे देवमळ्यातून शाही मिरवणूकीसाठी धामणीच्या पेठेत प्रस्थान झाले सोमवतीच्या सोहळ्यात मानकरी पंचरास मंडळीच्या ताफ्यातील डफडे.ढोलकी.ताशा.संबळ.सनई. तुतारीच्या पारंपारिक वाद्यात दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली मिरवणूकीत पालखीच्या पुढे लांडेवाडी (तालुका आंबेगांव ) मानकरी शेवाळे बंधू यांनी आणलेले खंडोबाचे वाहन असलेले रुबाबदार सजवलेले दोन अश्व (घोडा) सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. दिमाखदार मिरवणूक वाजत गाजत दुपारी बारा वाजता मंदिरात स्थिरावली व पालखीतील देवाचे पंचधातूचे मुखवटे पारंपारिक सेवेकरी भगत मंडळीच्या स्वाधीन करण्यात आले सोमवतीला येणार्‍या भाविकांसाठी देवस्थानाच्या वतीने बुंदी.भात आमटी महाप्रसाद ठेवला होता. दुपारी दोन वाजेपर्यत दोन हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला असल्याचे देवस्थानचे पूजारी दादाभाऊ भगत यांनी सांगितले सकाळपासून दर्शनासाठी भाविक येत होते दुचाकी व चारचाकी वाहानाने येणार्‍या भाविकांची संख्या मोठी दिसत होती खोबरे भंडारा विक्रीची व फुलांच्या हाराची आणि पेढ्याची दुकाने मंदिराबाहेर थाटलेली दिसत होती भाविकांच्या महाप्रसादाची सोय कुलस्वामी हाँल व जागरण देवकार्य सभामंडपात केलेली होती भाविकांना शुध्द पिण्याचे पाण्याची चांगली सोय केलेली होती पुढील वर्षी (२०२५साली) सोमवतीचा पर्वकाळ नसल्याने ठिकठिकाणच्या खंडोबा भक्तांना एक वर्षाची (२०२६) ची प्रतिक्षा करावी लागल्याची हूरहूर भाविकांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी येथील खंडोबा देवस्थानासाठी चांदीची तलवार.चांदीची पगडी.व भक्ती शक्तीचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांचे संगमरवरी आकर्षक शिल्प अर्पण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले

Leave a Comment