विधानभवन परिसरात मोठी खळबळ
Threat to blow up Vidhan Bhavan with a bomb



मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधानभवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत संपूर्ण इमारत रिकामी केली. सुरक्षेच्या कारणास्तव विधानभवनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना तातडीने सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढण्यात आले आहे.
अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी आल्याने पोलीस प्रशासन हाय अलर्टवर असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS) परिसराची कसून तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सर्व कर्मचारी इमारतीबाहेर जमा झाले असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या धमकीमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.