राज्य शासनाकडून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहिण योजनाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिन 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेसाठी कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र या योजनेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.
15 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेला नाही, त्यांना आज शेवटची संधी आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सरकारने अॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती.
परंतु आता जी मुदतवाढ दिली आहे. परंतु ऑनलाईन पद्धतीने किंवा अॅपने अर्ज करता येणार नाही. आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज करावा लागणार आहे.
चार वेळा केली मुदतवाढ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत 15 ऑक्टोबरनंतर संपणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांकडे फक्त आजचा दिवस असणार आहे. महिला आपल्या भागातील अंगणवाडी सेविकांकडे हा अर्ज करू शकतात. सरकारने या योजनेत अर्ज करण्यासाठी एकूण चार वेळा मुदतवाढ दिलेली आहे.
आतापर्यंत या योजनेसाठी एकूण 2 कोटी 47 लाख महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी आधी 15 जुलै 2024 पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून 31 ऑगस्ट केली. त्यानंतर 30 सप्टेंबर केली आणि आता तिसऱ्यांदा मुदत वाढ करत १५ ऑक्टोबर करण्यात आली.
लाडकी बहीण योजनेची मुदत 15 ऑक्टोबरनंतर संपणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना या योजनेचे पैसे बँक खात्यावर मिळत आहेत. पण पात्र ठरूनही अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. यासाठी बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.
कोणती कागदपत्र लागणार? लाडकी बहीण योजनेचा अर्ज देताना महिलांना आधार कार्ड, अधिवात/जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचं हमीपत्र, बँक पासबूक आणि अर्जदाराचा फोटो द्यावे लागणार आहेत.