मंगळवार पेठेत दारूच्या दुकानामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना त्रास

Photo of author

By Sandhya

Traffic congestion and inconvenience to citizens due to liquor shop in Mangwar Peth

मंगळवार पेठ येथील अमर वाईन शॉप बंद करावा किंवा स्थलांतरित करावा या संदर्भाचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे स्थानिक नगरसेविका कल्पनाताई दिलीप बहिरट यांनी दिले. या दारूच्या दुकानामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते तसेच ज्येष्ठ नागरिकांना तसेच परिसरातील नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होतो. महिलांना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हे दुकान कायमस्वरूपी बंद करावा अथवा दुसरीकडे स्थलांतरित करावे अशा आशयाचे निवेदन नगरसेविका कल्पनाताई बहिरट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी परिसरातील स्थानिक नागरिक महिला, पुरुष, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर दारूचे दुकान बंद करण्यासाठी 13 मार्च रोजी समर्थ पोलीस ठाण्यासमोर नगरसेविका कल्पनाताई बहिरट यांनी धरणे आंदोलन केले होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page